Sunday, December 6, 2009

वंशवाद आणि "जय भीम"

       दरवर्षी ६ डिसेंबरला चैत्यभूमीवर जमणारी गर्दी म्हणजे एक संघटित समाज आहे. समृद्ध सामाजिक दृष्टिकोन असणारा समाज. राजकारणाची चांगली जाणीव असणारा समाज. शिक्षणाचं वाढतं प्रमाण असलेला, आर्थिकदृष्ट्या उत्तरोत्तर प्रगत होत जाणारा समाज. इतक्या प्रभावी संघटित समाजामद्ये प्रगल्भ राजकीय नेतृत्वाची वानवा असण्याचं प्रमुख कारण म्हणजे हा समाज कम्युनिस्ट चौकटीमधे संघटित झालेला आहे. ही चौकट समूहप्रणालीवर आधारित असल्याने काही मोजक्याच नेत्यांना अवास्तव महत्त्व देण्याची प्रथा ह्या समाजात नाही. लोकशाही व्यवस्थेतील नोकरशाहीच्या पोलादी साच्यामधे अनेक महत्त्वपूर्ण पदांवर ह्या समाजातील व्यक्ती काम करत आहेत. सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशांपासून तो पोलिस चौकीतील हवालदारापर्यंत सर्व थरांमधे दलित व्यक्ती कार्यरत आहेत.

       ह्याचाच अर्थ हा समाज आता वंचित राहिलेला नाही. तसा तो नेमका वंचित कधी होता हाही संशोधनाचाच विषय ठरेल. १९४७ साली भारताची लोकसंख्या होती अवघी ३२ कोटी. त्यामधे हिंदू किती होते, मुसलमान किती होते आणि अन्यधर्मीय किती होते ? ह्या सगळ्या धबडग्यात दलितांची संख्या नेमकी किती होती ? एकूणच अर्थव्यवस्थेचा आकार अतिशय लहान असतांना दलितांचं शोषण झालं म्हणजे नक्की काय झालं ? पण पिढ्यानपिढ्या दलित समाजाचं शोषण झालं आहे असा बागुलबुवा उभा करण्यात कम्युनिस्टांना यश आलं आणि दलितांसाठी २७% टक्के आरक्षणाची मागणी सुरु झाली. त्यातही दांभिकपणा म्हणजे हे आरक्षण फक्त सरकारी नोक-यांपुरतंच मर्यादित ठेवलं गेलं. खाजगी आस्थापनांचे हितसंबंध अबाधित राखण्यासाठी "खाजगी क्षेत्रात आरक्षण" हा मुद्दा कधीच उचलून धरला गेला नाही. तामिळनाडूमधील दलित समाज हा वंचित कधीच नव्हता आणि आजही नाही. ह्या उलट राजस्थानातील ब्राह्मण समाज हा आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या कायम हलाखीच्याच परिस्थितीत राहिला. पण प्रत्येक वेळेला ब्राह्मणी व्यवस्थेच्या नावाने खडे फोडत राहून भारतातील ही उलटी सामाजिक विषमता कधीच उजेडात येणार नाही ह्याची पुरेपूर काळजी डाव्या आणि उजव्या कम्युनिस्टांनी घेतली.

       थोडक्यात सांगायचं तर वंशवादाचे बळी (Victims of Racism) हे प्रत्येक समाजात आहेत. दलितांमधे आहेत, ब्राह्मणांमधे आहेत, मराठ्यांमधे आहेत तसेच मुसलमानांत आणि OBC मधेही आहेत. ह्या सर्वांनी आपापसातले मतभेद विसरून एकत्रितरित्या Racist Tyranny विरुद्ध लढा द्यायला हवा. तरच ह्या जीवनसंघर्षात स्वतःचं अस्तित्व ते टिकवून ठेवू शकतील...

(Note : Here, the term "Racism" means combination of "Forward Racism upper cocks" & "Reverse Racism upper cocks".)

       सर्वसाधारणपणे वंशवादाचे बळी हे व्यक्तिप्रणालीचे सदस्य असतात. बहूशाखा ह्यनन्ताश्च बुद्धयोsव्यवसायिनाम् | ह्या उक्तीला अनुसरून ह्यातील बहुतांश व्यक्तींना एकापेक्षा जास्त विषयात रस असतो. त्यांच्यात विषयभिन्नता, स्वभावभिन्नता जास्त असल्यामुळे अशा लोकांना कोणत्याही एकाच छत्राखाली आणणं कठीण असतं आणि त्याची गरजही नसते. केवळ संघटनाबांधणी हेच कृतिशीलतेचं द्योतक मानल्यास व्यक्तिवादाचा पाडाव होतो आणि मग कृतिशीलतेच्या नावाखाली गटबाजी फोफावते, झुंडशाही सुरू होते. व्यक्तिप्रणालीमधील सर्व व्यक्तींनी स्वतंत्रपणे योग्य ते निर्णय घेतल्यास व्यवस्था सुरळीत चालू शकते. पण त्यासाठी अशा स्वतंत्र व्यक्तींना स्वतःचं अज्ञान दूर करण्यासाठी अथक परिश्रम करावे लागतात, आपली वैचारिक पातळी किंवा सर्वसाधारण प्रबुद्धता (consciousness level) वाढवावी लागते.

       व्यक्तिप्रणालीचं हे स्वरूप नीट न जाणल्यामुळेच प्रा. अरुण कांबळेंसारख्या झुंजार दलित लेखकाचं आयुष्य म्हणजे केवळ एक दिशाहीन संघर्ष ठरलं. प्रा. अरुण कांबळी स्वतः centerist असूनही त्यांनी Forward आणि Reverse अशा दोन्ही बाजूच्या Racist upper cocks ना सोयिस्कर ठरतील असे निर्णय घेतले. Arun Kambale didn't want to align with God or Truth whereas Devil-Satan camp didn't need him. त्यामुळे त्यांचं संपूर्ण आयुष्य हेच एखाद्या शोकांतिकेसारखं झालं.

No comments:

Post a Comment

We strongly believe in Freedom of Expression. So, comments or criticism in abusive language also is allowed here.
(of course we retain the authority to delete SPAM !)