Friday, January 1, 2010

Determinism & Free Will

अटळवाद आणि मुक्तभाव
(Determinism & Free Will)

       Natural law of "karma" or natural law of cause & effect says that every choice that you make will either push you towards your source or away from your source. If you occupy a specific position in the system hierarchy, then you have to make specific choices. In that case, your choices become predictable. That is why DETERMINISTS (विधिलिखित अटळ मानणारा गट) say everything is predetermined.

       There is certain assigned duty corresponding to every position in the system hierarchy. A perfect free-will person doesn't occupy any specific position in the system hierarchy. That means, this free-will person doesn't have any नियत कर्म (assigned duty). If system tries to assign any specific task to this free person, his will gets constrained and canot be termed as Free Will (मुक्तभाव). Even a free will person is NOT free from कर्मबन्धन (responsibility for actions).

       In the past, those who wanted to rule the world in the name of God had chalked out such elaborate procedures which made everything predictable for these rulers. Even public opinion becomes predictable if these procedures are used properly. There is close relationship between ultimate/unlimited authority & determinism. A perfect Free will person facilitates alternate power centre so that the things no longer remain predictable for authorities... By default, Almighty or Absolute Truth is source for such a free will person (if you are theist, use the term Almighty and if you are atheist, use the term Absolute Truth)...

       विश्लेषणाच्या सोयीसाठी जगातील सर्व लोकांना दोन गटांत विभागता येते --
१. समूहप्रणाली (Groupists based Ethos - Left & Right Communism)
२. व्यक्तिप्रणाली (Individualists based Ethos - Left & Right Capitalism)
       समूहप्रणालीमधे सामील होणा-या प्रत्येक व्यक्तीने स्वतःचा निर्णय-अधिकार हा समूहाच्या स्वाधीन केलेला असतो. समूहाने एकत्रितरित्या घेतलेला निर्णय हा त्या समूहातील प्रत्येक व्यक्तीवर बंधनकारक असतो. व्यक्तीप्रणालीमधे सामील होणारी प्रत्येक व्यक्ती ही स्वतः स्वतंत्ररित्या निर्णय घेते. स्वतः घेतलेल्या निर्णयाला ती व्यक्ती स्वतःच जबाबदार असते.
       समूहप्रणालीमधे अंतिमतः सर्व व्यक्तींचा निर्णय एकच असल्यामुळे त्या निर्णयाला आपोआपच ठामपणा येतो. पण व्यक्तीप्रणालीमधे दोन व्यक्तींनी स्वतंत्ररित्या घेतलेले निर्णय हे परस्परविरोधी असू शकतात. त्यामुळे एकाच निर्णयाला ठामपणा मिळण्याची शक्यता कमी असते.
       समूहप्रणालीमधे घेतल्या जाणा-या प्रत्येक निर्णयाला ठामपणा असला तरीही असा निर्णय बरोबर असेलच ह्याची १००% खात्री देता येत नाही. एकत्रितरित्या घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे संपूर्ण समूहाचे बरेच नुकसान होऊ शकते. व्यक्तीप्रणालीमधे परस्परविरोधी निर्णयांमुळे एका वेळेस सगळ्यांचंच नुकसान झालं असं सहसा होत नाही. म्हणजे दोन्हीपैकी प्रत्येक प्रणालीमधे काही फायदे आहेत तर काही तोटे आहेत. त्यामुळे समूहप्रणालीच चांगली किंवा व्यक्तीप्रणालीच चांगली असं निश्चितपणे सांगता येत नाही.
       साधारणपणे कमी शिकलेल्या व्यक्तींसाठी समूहप्रणाली सोयीची ठरते तर शिकलेल्या व्यक्तींमधे स्वतंत्र निर्णय घेण्याची क्षमता असल्यामुळॅ त्यांच्यासाठी व्यक्तीप्रणाली सोयीची ठरते असे ढोबळमानाने म्हणता येईल.

सांख्य आणि योग
       आपण समाजाला जेवढे देतो त्यापेक्षा जास्त समाजाकडून घेण्याचा अधिकार आपल्याला नाही -- कोणालाच तसा अधिकार नाही. समाजाकडून जास्त घेऊ पहाणा-या व्यक्ती अथवा व्यक्तीसमूह हे वस्तुतः गुन्हेगार तरी असतात किंवा संघटित गुन्हेगारीचा हिस्सा तरी असतात. अशी माणसे ही "सक्त" पद्धतीने काम करत असतात. ह्याउलट समाजाला जास्त देणा-या व्यक्ती अथवा व्यक्तीसमूह हे पापमुक्त अथवा दोषमुक्त समजले जातात. अशी माणसे ही "असक्त" पद्धतीने काम करत असतात. समूहप्रणालीमधे राहून "असक्त" पद्धतीने काम करणारी माणसे ही "सांख्य" मार्गाचे आचरण करत असतात तर व्यक्तीप्रणालीमधे राहून "असक्त" पद्धतीने काम करणारी माणसे ही "बुद्धियोग" मार्गाचे आचरण करत असतात.
सांख्य योगौ पृथग्बालाः प्रवदन्ति न पण्डिताः |
एकमप्यास्थितः सम्यगुभयोर्विन्दते फलम् |

       "सांख्य" आणि "बुद्धियोग" ह्या दोन्ही मार्गांमधे तत्त्वतः काहीही फरक नाही. स्वतःची वैयक्तिक आवडनिवड आणि भोवतालची परिस्थिती लक्षात घेऊन त्यानुसार कुठल्याही एका मार्गाची निवड करावी. अशा त-हेने निवडलेल्या मार्गाचे यथास्थित आचरण करत राहिल्याने आयुष्यातला बहुमोल वेळ योग्य त-हेने वापरला जातो.
निर्णय प्रक्रिया
       व्यक्तीप्रणालीमधे सामील होणा-या प्रत्येकाला स्वतंत्ररित्या निर्णय घ्यावा लागतो. समूहप्रणालीमधेही अंतर्गत ज्येष्ठताक्रम ठरवायचा असेल तर आपली निर्णयक्षमता सिद्ध करावी लागतेच.
       पर्याय 'अ' आणि पर्याय 'ब' ह्यातून एक पर्याय निवडतांना व्यक्तीला ठोस निर्णय घ्यावा लागतो. असा निर्णय घेतांना ती व्यक्ती एकतर "कार्यकारण" पद्धतीने निर्णय घेऊ शकते किंवा "तर्कशुद्ध" पद्धतीने निर्णय घेऊ शकते किंवा "अनमानधपका" पद्धतीने निर्णय घेऊ शकते.
१. पर्याय 'अ' किंवा पर्याय 'ब' ह्यापैकी कुठल्याही एकाची निवड करतांना केवळ त्या विशिष्ट निवडीचे संभाव्य परिणाम काय होतील एवढयाच गोष्टीचा विचार केला तर त्या निवड प्रक्रियेला "कार्यकारण" पद्धत असे म्हणतात.
२. पर्याय 'अ' किंवा पर्याय 'ब' ह्यापैकी कोणता पर्याय "योग्य" आणि कोणता पर्याय "अयोग्य" ह्याचे मूलभूत दृष्टीकोनातून विश्लेषण करून मगच "योग्य" पर्यायाची निवड केली तर त्या निवड प्रक्रियेला "तर्कशुद्ध" पद्धत असे म्हणतात.
३. पर्यायांच्या योग्यायोग्यतेचा अथवा निवडीच्या संभाव्य परिणामांचा विचार न करता केवळ अंदाजपंचे निर्णय घेतला तर त्या निवड प्रक्रियेला "अनमानधपका" पद्धत असे म्हणतात.
       "कार्यकारण" पद्धतीने निर्णय घेतांना सर्वसाधारणपणे स्वतःच्या व्यक्तिगत फायद्याचाच विचार व्यक्ती करत असते. त्यामुळे असा निर्णाय "तर्कशुद्ध" असेलच असं सांगता येत नाही. "माझा निर्णय भले तर्कसुसंगत नसेल पण त्या निर्णयाने माझा फायदा होणार आहे. म्हणून मी तोच निर्णय घेणार," असा व्यावहारिक विचार करणारी अनेक मंडळी समाजात असतात. चांगले-वाईट, सत्य-असत्य ह्यातील नेमका भेद त्यांना समजत नाही आणि समजला तरी त्याला ते जास्त महत्त्व देत नाहीत. अशा व्यक्तींना रजोगुणी व्यक्ती म्हणतात --
यया धर्ममधर्मं च कार्यं चाकार्यमेव च |
अयथावत्प्रजानाति बुद्धिः सा पार्थ राजसी |

       "तर्कशुद्ध" पद्धतीने निर्णय घेतांना पर्यायांच्या योग्यायोग्यतेचा विचार प्रामुख्याने केला जातो. ही योग्यायोग्यता केवळ नैतिक भूमिकेतून ठरवली जात नाही तर "अंतिम सत्य" आणि उपलब्ध पर्याय ह्यांच्या परस्परसंबंधांनुसार ठरवली जाते. नैतिक भूमिका आणि "अंतिम सत्य" ह्या गोष्टी परस्परविरोधी कशा काय असू शकतात ? बहुतांश वेळा नैतिकतेचे जोरदार समर्थन करणारी मंडळी ही केवळ रतिभावनेच्याच विरोधात बोलत रहातात. रतिभाव-विरोधी भूमिका (anti-sexuality stand) म्हणजेच उच्च नैतिकता असं समजत राहिल्यास केवळ हेकटपणा वाढतो आणि अशी तर्कटी मंडळी सत्याच्या विरुद्ध दिशेने जात रहातात. हे 'नैतिकतेचे ठेकेदार' शेवटी संघटित गुन्हेगारीचा हिस्सा बनतात आणि नैतिकतेच्या बुरख्याआडून अप्रत्यक्षपणे समाजाला लुबाडत रहातात. शांती, सौहार्द आणि माधुर्याचं समर्थन करणा-यांच्या साधनसंपत्तीला कात्री लावायचा सदैव प्रयत्न करतात.
       "अनमानधपका" पद्धतीने निर्णय घेणारी माणसे ही साधारणतः अज्ञानी किंवा अल्लड समजली जातात आणि ब-याचदा ती तशी असतातही. पण काही वेळा वस्तुस्थिती इतकी क्लिष्ट बनते की "कार्यकारण" आणि "तर्कशुद्ध" ह्यापैकी कोणतीही पद्धत वापरली तरी घेतलेला निर्णय अचूक वाटत नाही. अशा वेळेला नशीबावर भरोसा ठेऊन अंदाजपंचे निर्णय घेतला जातो.

मुक्तभाव
       वरील तीनपैकी नेमकी कोणती पद्धत वापरून निर्णय घ्यायचा हे काही अंशी व्यक्तीच्या स्वभावधर्मावर अवलंबून असते. आपण घेतलेल्या निर्णयांनुसार आपलं समाजातलं स्थान ठरतं. व्यवस्थेच्या उतरंडीवर एखाद्या विशिष्ट स्थानी जाण्यासाठी काही विशिष्ट पर्यायांची निवड करावी लागते. उतरंडीवर तुम्ही तुमचं स्थान निश्चित केलं असेल तर वाटेल तो पर्याय निवडण्याची मोकळीक तुम्हांला नसते. म्हणजेच तुमच्या स्वभावाला मुरड घालणं तुम्हांला भाग पडतं --
स्वभावजेन कौन्तेय निबद्धः स्वेन कर्मणा
कर्तुं नेच्छसि यन्मोहात्करिष्यसि अवशोsपि तत् |

       पण मुक्तभावी व्यक्तीचं तसं नसतं. व्यवस्थेच्या उतरंडीवर अशा व्यक्तीचं स्थान निश्चित केलेलं नसतं. त्यामुळे मुक्तभावी व्यक्ती (Free Will Person) कोणत्याही क्षणी कोणताही पर्याय निवडू शकते. आपल्या स्वभावाला मुरड घालण्याची गरज अशा व्यक्तींना नसते.
(Incomplete...)

1 comment:

Sam said...

# Enter the following information:

* User Information

Your Name: Type your name as you’d like it to appear when you send an email message.

E-Mail Address: Type your Yahoo! Mail Plus email address (for example, testing80@yahoo.com).
* Server Information

Incoming mail server (POP3): Type plus.pop.mail.yahoo.com.

Outgoing mail server (SMTP): Type plus.smtp.mail.yahoo.com.
* Login Information

User Name: Type your Yahoo! ID (your email address without the "@yahoo.com").

Password: Type your Yahoo! password.
* Select the Remember Password checkbox if you don't want Outlook to prompt you for your password each time you check your mail.
* Do not select the Require logon using Secure Password Authentication (SPA) checkbox.

# Click More Settings. The Internet E-mail Settings dialog box appears.
# Select the Outgoing Server tab:

* Select the My outgoing server (SMTP) requires authentication checkbox.
* Make sure that Use same settings as my incoming mail server is selected.

# Click the Advanced tab:

* Under Incoming Server (POP3), select the This server requires an encrypted connection (SSL) checkbox. The number in the Incoming Server (POP3) field usually changes automatically from 110 to 995. If it doesn’t, type 995.
* In the Outgoing Server (SMTP) field, type 465. Under Outgoing Server (SMTP), select the This server requires an encrypted connection (SSL) checkbox.
* If you want to save your Yahoo! Mail messages on both the Yahoo! Mail server and on your computer, select the Leave a copy of messages on the server checkbox. If you want your messages to be deleted from the Yahoo! server once Outlook has downloaded them onto your computer, leave the box unchecked.

Post a Comment

We strongly believe in Freedom of Expression. So, comments or criticism in abusive language also is allowed here.
(of course we retain the authority to delete SPAM !)