Friday, April 3, 2009

प्रसिद्धी आणि जनादेश

लोकेsस्मिन्द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मयानघ
ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां

          निवडणुकीचे वारे वाहू लागल्यावर प्रचारकार्याला वेग येतो. रिंगणातील उमेदवार लोकांपर्यंत पोचण्यासाठी,
      १. व्यक्तिगत संपर्क
      २. जाहीर सभा आणि
      ३. प्रसारमाध्यमे
अशा विविध उपायांचा अवलंब करतात. ह्या तीनही उपायांमधून मिळणारी प्रसिद्धी आणि प्रत्यक्ष निवडणुकांमधे मिळणारी मते ह्यांमधे सुसूत्रता असतेच असं नाही. व्यक्तिगत संपर्कामधून मिळणा-या प्रसिद्धीचा वेग कमी असतो तर प्रसारमाध्यमांतून झटपट प्रसिद्धी मिळू शकते. सर्वसाधारणपणे संथ प्रसिद्धी ही अधिक टिकाऊ तर झटपट प्रसिद्धी ही तात्कालिक स्वरूपाची असते. व्यापक आणि टिकाऊ जनाधार मिळवण्यासाठी तीनही उपायांचा काळजीपूर्वक वापर करावा लागतो. उदाहरणार्थ, भाजपा सदस्या पूनम महाजन ह्या व्यक्तिगत संपर्कावर जास्त भर देतात त्यामुळे फारच कमी लोकांपर्यंत त्या पोचू शकतात. ह्या उलट नारायण राणे हे प्रसारमाध्यमांचा जास्त वापर करतात. प्रसिद्धीसाठी केवळ प्रसारमाध्यमांवर अवलंबून राहिल्यास तुम्ही celebrity म्हणजेच उत्सवमूर्ती बनू शकाल पण प्रत्यक्ष निवडणुकांमधे तुम्हांला मतं मिळतीलच असं नाही. ह्याचं प्रमुख कारण म्हणजे समाजात बोकाळलेली गटबाजी.
          Marginal voters म्हणजेच निष्पक्ष मतदारांची संख्या किती आहे ह्यावर प्रसारमाध्यमांची परिणामकारकता अवलंबून असते. काश्मीर राज्याप्रमाणे संपूर्ण समाज हा जर विविध गटांमधे विभागला गेला असेल तर प्रसारमाध्यमे निरर्थक ठरतात कारण प्रसारमाध्यमांकडून मिळणा-या माहितीवर विचार करून स्वतःचं मत बनवणा-यांची संख्या अत्यल्प असते. काहीही झालं तरी लोकं आपापल्या गटातील उमेदवारालाच मत देतात. प्रत्येक गटातील सदस्यांची यादी तपासली तर प्रत्यक्ष मतदानापूर्वीच निवडणुकीचा निकाल समजू शकतो. म्हणजेच अशा समाजात निवडणुकांवर आधारित लोकशाही प्रक्रिया हा केवळ एक उपचार ठरतो !
          सुरुवातीला उद् धृत केलेल्या गीतेतील श्लोकानुसार समाजात दोन प्रकारच्या व्यक्ती असतात. त्यापैकी ज्ञानाधिष्ठित सांख्ययोगाचे अनुसरण करणा-या व्यक्ती ह्या marginal voters म्हणून योग्य त-हेने काम करू शकतात. पण communism/marxism/leninism असे निरनिराळे Ideology वाले गट हे कर्मयोगाचे आचरण करण्यावर जास्त भर देऊन सांख्ययोगाचं credit कमी रहावं असा आग्रह धरतात. अपु-या credit मुळे साहजिकच सांख्ययोगाचे अनुसरण करू इच्छिणा-या व्यक्तींची संख्या कमी होते आणि अज्ञानी, गोंधळलेल्या किंवा अकार्यक्षम व्यक्तींनाच marginal voters म्हणून पुढे केले जाते...



1 comment:

Samir said...

Celebrities & Rape Laws
Media is all set to project Bollywood film-maker Bhandarkar as an innocent person. His latest film "Jail" also tries to project criminals as victims of "law & order system" !
Supporters of Bhandarkar are using the standard defenses used by a typical lawyer of a rapist. They start from the definition of RAPE & say that whatever happened between Preeti Jain & Bhandarkar cannot be called as rape. Basically, any sexual intercourse based upon "cheating" can be considered as RAPE. The term "physically overpowering the victim" needs careful consideration. In many situations, the victim is so scared that the rapist, without having to go for any physical abuse, can carry out intercourse. This scared state of victim should NOT be considered as "consent".
Second standard defense used by rapist's lawyer is to project victim as immoral person (or prostitute). In Preeti Jain's case, Bhandarkar promised to cast her as actress in his films. That means, indirectly he was threatening her that he can destroy her film-career if she rejects his indecent proposal. Her ignorance prompted her to assume that Bhandarkar was the mightiest person in film industry & that she didn't have the resources to oppose him. Bhandarkar knew this weakness of Preeti Jain & he tapped her weakness to further his illicit desires. Under these circumstances, Preeti Jain should NOT be labeled as a person with weak moral character.
That means Bhandarkar cannot escape punishment if he accepts that he had sexual intercourse with Preeti Jain. If rejects having any such intercourse, then the case will be entirely different. But his reluctance to reject having any intercourse with Preeti Jain is simply guided by his pervert mentality. We strongly condemn Bhandarksr's intentions to soften the "Rape laws" which are in place on Indian soil.

Note : Above defense will fail if Preeti Jain herself changes her stand & gives clean chit to Bhandarkar. Afterall, it's a celebdom. Anything can happen !!!

Post a Comment

We strongly believe in Freedom of Expression. So, comments or criticism in abusive language also is allowed here.
(of course we retain the authority to delete SPAM !)