Tuesday, April 7, 2009

लोकशाहीची सर्कस

          ULFA चा आज स्थापना दिवस. काल स्वतःच्याच गल्लीत बॉम्बस्फोट घडवून नक्षलवाद्यांनी ULFA वर टेपरण ठेवण्याचा प्रयत्न केला. गौहाटीमधील मालिगांव भागात झालेल्या ह्या स्फोटांच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्रालयाने आज एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. सदैव लुंगी घालून फिरणारे देशाचे दाक्षिणात्य गृहमंत्री पी. चिदंबरम ह्यांच्यावर ह्या पत्रकार परिषदेत बूट भिरकावण्यात आला. त्यामुळे मार्क्सवाद्यांना डोक्यावर बसवून ठेवणा-या कॉन्ग्रेस पार्टीची सगळी पितरं आज धन्य झाली.

          तिकडे जयप्रकाश नारायण ह्यांचे खंदे समर्थक लालू प्रसाद यादव ह्यांनी परत भन्नाट वक्तव्य करून एकच धमाल उडवून दिली. लालू प्रसाद यादव हे भारतीय लोकशाहीच्या सर्कशीतले विदूषक म्हणूनच ओळखले जातात. त्यामुळे लालू प्रसादांवर टीका करण्यात वेळ वाया घालवणं हे आमच्या वैचारिक बैठकीत बसत नाही. स्वतंत्र भारतात प्रतिसरकार स्थापन करणा-या महामठ्ठ जयप्रकाश नारायणांचे बिनडोक समर्थक पोरकटपणाशिवाय दुसरं काहीच करू शकत नाहीत हे मात्र आता स्पष्ट झालं आहे. अवजड उद्योगधंद्यांना विरोध करणारे राममनोहर लोहिया, प्रतिसरकारवाले जयप्रकाश नारायण, भांडवल म्हणजे नक्की काय हेच माहित नसलेले कार्ल मार्क्स असल्या खुळसटांच्या आचरटपणालाच Ideology असं गोंडस नाव देऊन स्वतःबरोबर इतरांचीही दिशाभूल करण्यात मार्क्सवाद्यांचा हातखंडा आहे. अशा ह्या मूर्खांच्या बाजारालाच "लोकशाही" अशी संज्ञा असेल तर सूज्ञ व्यक्तींनी ह्या लोकशाहीच्या चौकटीबाहेरच रहावे हे उत्तम !

No comments:

Post a Comment

We strongly believe in Freedom of Expression. So, comments or criticism in abusive language also is allowed here.
(of course we retain the authority to delete SPAM !)