Saturday, March 28, 2009

वरूण गांधी आणि राज ठाकरे

>>>>> शेवटी हवेत तरंगणारा वरूण गांधींचा पतंग जमिनीवर आला. पिलिभीत न्यायालयाने त्यांना दोन दिवस कोठडीत डांबण्याचं फर्मान काढलं. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरेंनासुद्धा कल्याणच्या न्यायालयाने रात्रभर कोठडीत बंद केलं होतं. ह्या दोन्ही घटनांमधे बरेच साम्य आहे. राज ठाकरेंप्रमाणेच वरूण गांधीही दोन ते तीन दिवस टिकणारी लोकप्रियतेची लाट तयार करू शकतात. ह्या लाटेचा जोर पाहून सुरुवातीला कोणाचाही असाच ग्रह होतो की कोणतीतरी सार्वभौम शक्ती ह्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. पण दोनच दिवसात ह्या सर्व नाटकाचा शेवट पोलिसांच्या कोठडीतच होतो.
>>>>> हे असं का व्हावं ? प्रसारमाध्यमांतून होणा-या Publicity च्या प्रमाणात खंबीर आणि टिकाऊ जनाधार त्यांच्या बाजूला कधीच नसतो. अशा नाटकांचा शेवट नक्की कुठे व्हायला हवा ह्याबाबत कसलीही ठोस योजना त्यांच्याकडे नसते. व्यापक वैचारिक बैठक नसतांना एखाद्या तात्कालिक मुद्याच्या भांडवलावर लोकप्रियतेची लाट तयार करून तुम्ही स्वतःला बाजीराव समजायला लागलात तर असंच व्हायचं. केवळ ad hoc पद्धतीने नाचरेपणा करून दूरगामी राजकारणं करता येत नाहीत. असो.
>>>>> २८ वर्षांच्या वरुण गांधींच्या हातात अजूनही अनेक बहुमोल वर्षे शिल्लक आहेत. दोन दिवसांची कोठडी ही त्यांनी आत्मचिंतनासाठी वापरली तर त्याचा पुढील वाटचालीसाठी नक्की उपयोग होईल.

1 comment:

स्वामी तेजानंद महर्षी said...

बेंबटयाची धमकी
इन्फॉर्मेशन ब्युरोच्या अहवालानुसार वरुण गांधी हा छोटा शकीलच्या माणसांकडून ठार मारला जाऊ शकतो. छोटा शकीलचं नाव घेऊन उत्तर प्रदेश प्रशासनाला स्वतःच वरून गांधीला एनकाऊंटरमधे ठार करायचं असेल दुसरं काय ? अन्यथा छोटा शकील नामक बेंबटया काय घंटा मारणार वरुणला ? जसा काही सगळा जोर ह्या दाढीवाल्या बोकडांच्या सुंता केलेल्या Dildo तच आहे. मग आमचे Dildo आम्ही काय नुसते मुट्टया मारण्यासाठीच ठेवले आहेत की काय ?

Post a Comment

We strongly believe in Freedom of Expression. So, comments or criticism in abusive language also is allowed here.
(of course we retain the authority to delete SPAM !)