>>>>> आंध्र प्रदेशमधील आंध्र-ओरिसा सीमेजवळील पोलावरम प्रकल्पाला केंद्रीय जल आयोगाने मंजुरी दिली. ह्या प्रकल्पामुळे कृष्णा खो-यातील २०६० टीएमसी पाण्यापैकी आता महाराष्ट्राच्या वाटयाला पुनर्वापराचे पाणी धरून ५९९ टीएमसी एवढे पाणी येते. उर्वरित पाण्यापैकी आंध्र प्रदेशला ७८६ टीएमसी तर कर्नाटकला ७०० टीएमसी एवढे पाणी जाते. म्हणजेच कृष्णा खोरे विकासकामांवर जो खर्च झाला त्यातून ५९९ टीएमसी एवढे पाणी महाराष्ट्र मिळवत आहे.
>>>>> "कृष्णा खोरे विकास महामंडळ" अस्तित्वात येण्यापूर्वीसुद्धा कृष्णेच्या काठी लोकं शेती वगैरे करत होतेच. तेव्हां किती पाणी महाराष्ट्र वापरत होता ? ते पाणी ह्या ५९९ टीएमसी मधून वजा केल्यावर उरलेलं पाणी हे कृष्णा खोरे विकास महामंडळामुळे मिळालं असं म्हणता येईल. महामंडळामुळे मिळालेले पाणी आणि महामंडळाने केलेला खर्च ह्यामधे सुसुत्रता असायला हवी. मिळालेल्या पाण्याच्या प्रत्येक घनफुटासाठी किती खर्च केला गेला ह्यावर कृष्णा खोरे विकास महामंडळाची व्यवहार्यता, कार्यक्षमता आणि विश्वसनीयता अवलंबून राहील...

 
 Posts
Posts
 
 
No comments:
Post a Comment
We strongly believe in Freedom of Expression. So, comments or criticism in abusive language also is allowed here.
(of course we retain the authority to delete SPAM !)