Sunday, March 22, 2009

राज ठाकरे आणि निवडणुका

>>>>> नाशिकमधे राज ठाकरेंनी प्रचाराचा नारळ फोडला. नेहमीप्रमाणेच त्यांच्या सभेला प्रचंड गर्दी जमली होती. पण निवडणुकीच्या दिवशी ही गर्दी मनसेच्या व्होट बॅंकेमधे परिवर्तित होईल का हाच खरा प्रश्न आहे. सुपरस्टार अमिताभ बच्चनसारख्या ला सतावणारा प्रश्न आज राज ठाकरेंपुढेही उभा आहे. अमिताभ बच्चनच्या चाहत्यांमधे सर्व पक्षांमधील लोकं आहेत. निवडणुकांमधे कॉन्ग्रेसला मत देणारे तसेच भाजपला मत देणारे असे दोन भिन्न प्रवृत्तीचे मतदार हे एकाच अमिताभ बच्चनचे चाहते आहेत. राज ठाकरेंच्या बाबतीतही तोच प्रकार होत आहे. निवडणुकीत कॉन्ग्रेसला मत देणारे आणि भाजपला मत देणारे असे दोन्ही प्रकारचे मतदार हे "मराठी अस्मिता" ह्या मुद्यावर राज ठाकरेंचं म्हणणं उचलून धरतात. पण केवळ "मराठी अस्मिता" हाच एकमेव मुद्दा घेऊन स्वतंत्र राजकीय पक्ष चालवता येत नाही. राजकीय पक्ष म्हणून बस्तान बसवायचे असेल तर राज ठाकरेंना एक व्यापक वैचारिक बैठक निर्माण करावी लागेल. अर्थकारण, धर्मकारण, समाजकारण अशा अनेक पैलूंवर एक consistent भूमिका घ्यावी लागेल. हे सर्व करण्यासाठी लागणारे मनुष्यबळ सध्यातरी मनसेकडे दिसत नाही. अशा परिस्थितीत एक राजकीय पक्ष बनण्याचा अट्टाहास न धरता एक बिगर राजकीय संघटना म्हणून मनसेची स्थापना केली असती तर ते अधिक योग्य ठरले असते...

1 comment:

Samir said...

शिवसेना-मनसेचं वृषण ठेचलं :
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने हिंदी-विरोधी भूमिका घ्यायला नकार देऊन शिवसेना-मनसे समर्थकांची पार सुंता करून टाकली. राजकीय दृष्ट्या पाहिलं तर तेंडुलकरचं वक्तव्य सरळ सरळ काँग्रेसच्या भूमिकेशी मिळतं जुळतं आहे. पण जनमानसातील तेंडुलकरच्या प्रतिमेमुळे सचिनला विरोध करणं शिवसेना-मनसेच्या आवाक्याबाहेर गेलं. थोडक्यात सांगायचं तर सचिन तेंडुलकरने शिवसेना आणि मनसे दोघांनाही एकाच घासात गिळून टाकलं.
मुळात लुंगीवाल्या दाक्षिणात्यांच्या कडेवर बसून शिवसेना-मनसेने हिंदी विरोधी भूमिका घ्यायला सुरुवात केली तेव्हांच त्यांच्या नाशाची बीजं रोवली गेली. मराठी आणि हिंदी ह्या दोन्ही भाषांसाठी देवनागरी लिपीच वापरली जाते. कर्ता कर्म क्रियापदांचे नियमही दोन्ही भाषांसाठी बरेचसे सारखे आहेत. त्यामुळे हिंदी भाषा समजणं हे मराठी माणसाला फारसं अवघड जात नाही. अशा परिस्थितीत दक्षिण भारतीयांच्या नादाला लागून शिवसेना-मनसेने हिंदी विरोधी भूमिकेचा प्रसार करायला सुरुवात केली, "हिंदी ही राष्ट्रभाषा आहे की नाही" असल्या गुळगुळीत वादामध्ये मराठी माणसाला ओढायचा प्रयत्न केला. मनसेने तर महाराष्ट्र विधानसभेला पार कुंभमेळ्याचंच स्वरूप आणलं. चमत्कारिक पद्धतीने हैदोस घालून अबु आझमीला फुकटात Hero बनवलं.
निरीश्वरवादी भूमिका म्हणजेच उदारमतवादी भूमिका ह्या सार्वत्रिक गैरसमजामधूनच हा नको तो वाद बोकाळला आहे. मनसेला हिंदुत्वाच्या मुद्यात स्वत:ला गुंतवून घ्यायचं नव्हतं आणि शिवसेनेलाही हिंदुत्वाच्या जोखडाखालून आपली मान सोडवून घ्यायची होती. म्हणूनच ह्या दोघांनी मराठी अस्मितेच्या मुद्यावर वातावरण तापवायचा जुगार खेळून पाहिला. पण केवळ उडाणटप्पूंना हाताशी धरून उंडगेगिरी करण्याने काहीही साध्य झालं नाही. उलट "मराठी बाणा" म्हणजे भोंगळपणा हे पूर्वापार चालत आलेलं समीकरण आणखीनच दृढ झालं. बांधकाम व्यवसायाशी जवळीक सांगणा-या राज ठाकरेंना राजकारणातलं "ओ का ठो?" काहीही कळत नाही हेही ह्या निमित्ताने स्पष्ट झालं. शिरीष पारकरसारखे दगड Ivory Tower मध्ये बसून स्वत:ला भांडवलदार समजायला लागले की दुसरं काय होणार ?
अर्थात शिवसेनेमधेही भोंगळपणा ठासून भरला आहे. "कोहिनूर" वाल्या मनोहर जोशींना सचिन तेंडुलकरबद्दल बोलायला सांगा. वयोवृद्धांचा आवाका लगेच स्पष्ट होईल. नरेंद्र मोदींच्या विरोधात बोलणं जोशी सरांना भले सोपं गेलं असेल पण तेंडुलकरविरोधी भूमिका घेतांना मनोहरपंतांना बरीच कसरत करावी लागेल...

Post a Comment

We strongly believe in Freedom of Expression. So, comments or criticism in abusive language also is allowed here.
(of course we retain the authority to delete SPAM !)