>>>>> क्रिकेटच्या अतिरेकामुळे समाजाचं निर्बुद्धीकरण होतं हे काही खोटं नाही. दाक्षिणात्य चित्रपटक्षेत्राप्रमाणेच ह्या क्रिकेटवाल्यांनी स्वतःला overestimate केलेलं आहे. भारतातील सार्वत्रिक निवडणुकांमुळे IPL चं वेळापत्रक गडबडलं. ह्यामुळे प्रस्थापितांचा नुसता तिळपापड झाला. लोकं क्रिकेटला निवडणुकांएवढंच किंबहुना जास्तच महत्त्व देतील असं मानणा-यांचा महापोपट झाला. प्रत्यक्षात क्रिकेट हे सुजाण नागरिकांच्या खिजगणतीतसुद्धा नाही. Match Fixing मुळे लोकांचं क्रिकेटमधील स्वारस्य संपलेलं आहे. युरोपात जसा फुटबॉलचा उदो केला जातो तसंच भारतात प्रसारमाध्यमांद्वारे तिन्ही त्रिकाळ उगाचच क्रिकेटचं च-हाट वळलं जातं. हे चे सामने देशाबाहेर खेळले जाणार म्हणून कोणाचंही काहीही बिघडत नाही. हे सामने पूर्णपणे रद्द झाले असते तरी कोणालाही त्याचं सोयरसुतक नव्हतं. IPL बरोबर अव्वाच्या सव्वा रकमेची जाहिरात कंत्राटं ठरवणा-या कंपन्यांना Business नक्की किती समजतो ? ह्या कंपन्यांच्या Marketing Department मधे सगळी सुमार दर्जाची वशिल्याची तट्टं "व्यवस्थापक" म्हणून काम करत आहेत.
>>>>> IPL चे सामने देशाबाहेर खेळले जाणार म्हणजे जणू काही Foreign Direct Investment देशाबाहेर चालली आहे असा गैरसमज उराशी बाळगत नरेन्द्र मोदींनी तोंड सोडलं. IPL ला गुजरात राज्य सुरक्षा देऊ शकेल असं मोदी कशाच्या आधारावर सांगत आहेत ? गुजरात राज्याची सुरक्षा व्यवस्था एवढी चोख होती तर अहमदाबाद स्फोटमालिका का झाल्या ? अहमदाबादमधील झाडाझाडांवर टांगलेले बॉम्ब आम्ही स्वतः टेलिव्हिजनच्या वाहिन्यांवर पाहिलेले आहेत !!! गुजरात पोलिसांनी ज्या च्या कार्यकर्त्यांना आरोपी म्हणून पकडलं त्यांचं पुढे काय झालं ? असल्या प्रश्नांची उत्तरं देत बसायला मोदींकडे वेळ नाही आणि pro-Muslim प्रसारमाध्यमांना "हिंदू दहशतवाद" हाच बिनबुडाचा मुद्दा दामटून पुढे रेटायचा आहे, असो. IPL सामन्यांच्या मुद्यावरून शरद पवार आणि नरेन्द्र मोदी ह्यांच्या शर्यतीत कोण पुढे जाणार ह्याचं उत्तर काळच देऊ शकतो...

 
 Posts
Posts
 
 
No comments:
Post a Comment
We strongly believe in Freedom of Expression. So, comments or criticism in abusive language also is allowed here.
(of course we retain the authority to delete SPAM !)