>>>>> अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष आनंद यादव ह्यांच्या राजीनामानाटयामुळे यंदाचे संमेलन चांगलेच गाजले. अध्यक्षांच्या अनुपस्थितीत पार पडलेला हा उद् घाटन सोहळा म्हणजे Ideology ची जपमाळ ओढणा-यांच्या दुटप्पीपणाला बसलेली चपराकच आहे.
>>>>> मुळात "संतसूर्य तुकाराम" ह्या पुस्तकात अनवधानाने(!) प्रसिद्ध झालेल्या आक्षेपार्ह मजकुराबद्दल स्वतः आनंद यादव ह्यांनी पूर्वीच बिनशर्त माफी मागितली आहे. ह्या पुस्तकाचे प्रकाशनही थांबवण्यात आले आहे. वारकरी संप्रदायाच्या प्रगल्भ जागरुकतेमुळेच हे घडू शकले. अन्यथा आविष्कार स्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदू संतपरंपरेवर बिनबुडाची टीकाटिप्पणी करणा-यांच्या अकला ठिकाणावर कशा आल्या असत्या ? पण निरीश्वरवादी भूमिका हीच विचारशीलतेची परमावधी मानणा-यांना "संतसूर्य तुकाराम" च्या मुद्यावर झालेला स्वतःचा पराभव पचवता आला नाही. त्यातूनच हा संमेलनाध्यक्षांच्या राजीनामा नाटयाचा हिणकस प्रयोग सुरू झाला. विख्यात गायिका आशा भोसले ह्यांनी आपल्या परीने Ideology वाल्यांची पाठराखण करण्याचा भरपूर प्रयत्न केला. पण एकूणच निरीश्वरवादी कंपूमधे वाढत चाललेला असहिष्णु उथळपणा (mediocrity) सुजाण नागरिकांना कदापि मान्य होणार नाही ...

 
 Posts
Posts
 
 
No comments:
Post a Comment
We strongly believe in Freedom of Expression. So, comments or criticism in abusive language also is allowed here.
(of course we retain the authority to delete SPAM !)