Sunday, March 8, 2009

General Elections 2009

( 7:13 PM 3/8/2009) >>>>> ओरिसामधील बीजू जनता दलाने भाजपाबरोबरचे संबंध तोडून टाकल्यावर बिहारच्या मुख्यमंत्र्यांनाही अवसान चढलं. "आम्हांलाही भाजपाबरोबर सोयरीक नको " अशी पोरकट घोषणा करून नितीशकुमार मोकळे झाले. मग इतके दिवस JDU भाजपाबरोबर फुगडया का खेळत होतं ? झारखंडची निर्मिती झाल्यावर लगेच भाजपाबरोबरचे संबंध तोडायला हवे होते. पण तेवढी हिंमत JDU मधे असती तर आणखी काय हवं होतं ? नितीशकुमारसारख्या अपरिपक्व नातवंडांना भाजपामधल्या आजोबांचं बोट सोडून चालताच येत नाही. उगाच जमत नाही तर उंटाच्या शेपटाचा मुका कशाला घ्यायला बघता ?

1 comment:

Sam said...

तरुण मतदार
निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या की कॉलेजात जाणा-या तरुणाईचं राजकारणातील नेमकं स्थान स्पष्ट होतं. आजची तरुणाई ही कोणत्याही दृष्टीने राजकीय क्षेत्र प्रभावित करू शकत नाही. कोणत्याही मतदारसंघामधे तरुणाईची व्होट बॅंक बनू शकत नाही. "अज्ञान" हा तर तरुणाईचा स्थायीभाव आहे. आम्ही कॉलेजात असतांनाही हे खरं होतं पण आम्हांला असलेल्या प्रगुणनामुळे आमच्या मतानुसार राजकीय निकाल प्रभावित व्हायचे. Formal लोकशाही मधे समान मताधिकार अस्तित्वात असला तरी informal व्यवस्थेमधून हे प्रगुणन लागू व्हायचे. आज प्रगुणनाच्या अभावामुळे तरुणांच्या मताला काडीचीही किंमत नाही. त्यामुळे Today's yongsters are politically insignificant for every political party.

Post a Comment

We strongly believe in Freedom of Expression. So, comments or criticism in abusive language also is allowed here.
(of course we retain the authority to delete SPAM !)