भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीला उद्या ६१ वर्षे पूर्ण होतील. वाटाघाटी करून स्वातंत्र्य मिळवल्याने देशाची फाळणी झाली. त्या फाळणीतूनच तैयार झालेला काश्मीरचा गुंता गेल्या महिनाभरात चमत्कारिक पद्धतीने सुटला. Lal Masjid प्रकरणापासून भारत-पाक संबंधांमधील समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. ह्या बदलांचा नेमका अंदाज "आझाद काश्मीर" वाल्यांना आलेला नाही. म्हणूनच गेला महिनाभर त्यांनी आचरटासारखे आन्दोलन काश्मीरमधे सुरू ठेवले आहे.
आज काश्मीर भारताला काही देण्याऐवजी भारताकडून बरेच काही मिळवत आहे. कॉंग्रेसच्या अदूरदर्शी धोरणांमुळे अव्वाच्या सव्वा साधन-संपत्ती खर्च करून आपण काश्मीर भारताला चिकटवून ठेवत आहोत. पाकिस्तानमधे सामील झाल्यास काश्मिरी जनतेचे per head credit फाटकन कमी होईल. कारण भारतासारखी बेवकूफी करण्याचे पाकिस्तानला काहीच कारण नाही. पाकिस्तानवादी काश्मिरींना त्यांची लायकी पाकिस्तान सहज समजावून देईल. त्यामुळे But for Kashmiri separatists, no one else needs to work hard to ensure that Kashmir remains integral part of India ! म्हणजेच भारत आणि पाकिस्तान दोघांसाठी Liability ठरणारा काश्मीर हा जवळ जवळ "आझाद" झाल्यातच जमा आहे !
अर्थात ही गोष्ट आता काश्मीरमधील फ़ुटिरतावाद्यांच्याही लक्षात आली आहे. एकत्र कुटुंबाचा हिस्सा असतांना वेगळी चूल मांडण्याच्या गोष्टी करणं सोपं आहे. पण प्रत्यक्षात वेगळं झाल्यावर "गेहूँ चावल का दाम समझने लगता है". केवळ Tourism हेच उत्पन्नाचे साधन असेल तर तुमच्या सार्वभौमत्वाच्या बडबडीला कुत्रासुद्धा भीक घालणार नाही...
1 comment:
Down with Fascism
उगाच गमजा कराल तर मग तोडुन ठेवू तंगड्या
बैलमुसंड्या म्हणता ज्याला त्या तर बेडुकउड्या
अमरनाथसह वितळुनि गेले सगळे पोकळ दावे
मुट्ट्या मारुनि थकले अवघे भगवे आणिक हिरवे
Post a Comment
We strongly believe in Freedom of Expression. So, comments or criticism in abusive language also is allowed here.
(of course we retain the authority to delete SPAM !)