Wednesday, August 13, 2008

पेद्रू V.H.P.

अपेक्षेप्रमाणेच आज दिवसभरात विश्व हिंदू परिषदेच्या बेंबट्यांचा पचका झाला. बापाने लाडात वाढवलेल्या सुमार दर्जाच्या खुळसटांनी स्वत:ला Gladiators समजावं हाच मुळात एक विनोद होता. शीख व मुसलमानां पाठोपाठ हिंदू धर्मांध शक्तींचा पाडाव होणं ही काळाची गरजच होती. सेतुसमुद्रम मधे मलिदा हादडणा-यांनी आता प्रभु रामचन्द्रांचे चरणकमल सोडून "जय भोले" असा एकच गजर सुरू केला आहे. पहिल्या महायुद्धाचं कर्ज परत न करणा-या फ्रान्सच्या जिवावर उडया मारणा-या ह्या रिकामटेकड्यांना आयुष्यात अक्कल येण्याची शक्यता शून्यच आहे. पाश्चिमात्य देशातले खुशालचेंडू तुम्हांला माकडासारखे नाचवतात आणि तुम्ही नाचता ह्याला काय म्हणावे ? Greater Noida मधे आजच शेतक-यांच्या नावावर आन्दोलन करून तथाकथित किसान नेत्यांनी धर्मांध शक्तींना अप्रत्यक्ष हातभारच लावला आहे. Fascism च्या मुद्यावर मार्क्सवाद्यांचा खरा चेहरा उघड होत आहे. ही सारी नौटंकी म्हणजे स्वतंत्र भारताला लागलेली कीड आहे. ही सगळी निर्लज्ज कीड खरवडूनच निघायला हवी...

No comments:

Post a Comment

We strongly believe in Freedom of Expression. So, comments or criticism in abusive language also is allowed here.
(of course we retain the authority to delete SPAM !)