Tuesday, February 3, 2009

मंदीच्या खाईत अमेरिका

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बाराक ओबामा हे डबघाईला आलेल्या अमेरिकी अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. मात्र ज्या आर्थिक नीतींमुळे अमेरिकी अर्थव्यवस्थेचं भजं झालं तीच अर्थनीती ते परत आणू पहात आहेत. "खाजगी भांडवलाचं प्रगुणन" हा अशाच चुकीच्या अर्थनीतीचा भाग आहे. साधं चक्रवाढ व्याज काढण्यासाठीसुद्धा ज्यांना कोष्टकं वापरावी लागतात अशा खुळसटांना अमेरिकेने पतपेढया आणि पतपत्रसंस्था चालवायला दिल्यामुळेच हे आर्थिक दिवाळखोरीचं संकट अमेरिकेपुढे उभं ठाकलं आहे. खाजगी भांडवल प्रगुणित करण्याच्या आचरटपणामुळेच अल्पशा भांडवलावर अव्वाच्या सव्वा कारभार केला जातो. त्यामुळे मग कोणाचाच पायपोस कोणाच्या पायात रहात नाही. भांडवलपूर्तीचं गुणोत्तर कमी झाल्याने आत्मविश्वासाच्या नावाखाली उनाडक्या करणा-या माकडांची संख्या बाजारात वाढते.
दाढीवाले बोकड
पुन्हा एकदा अल्-कैदाच्या दाढीवाल्या बोकडांनी आपल्या मठ्ठपणाचं प्रदर्शन सुरू केलं आहे. काय तर म्हणे, "अल्लाके बंदे चारों ओर से भारत पर हमला कर देंगे." वाळंटात फिरणा-या उंटांनासुद्धा ह्या खुळसटांपेक्षा जास्त अक्कल असेल. एकूणच मुस्लीम समाजाला निरक्षर अडाणी म्हणून जगभरात project करणा-या ह्या बोकडांमुळे मुसलमान समाजाचं नुकसानच जास्त होत आहे. ख्रिश्चन धर्मीयांविरुद्ध भांडण्यासाठी सोयीची वाटली म्हणून युरोपने ही अल्-कैदासारखी माकडं पाळली. पण आता स्वतःलाच डोईजड झालेल्या ह्या माकडांना भारत आणि अमेरिकेच्या विरोधात वापरण्याचा केविलवाणा प्रयत्न युरोपियन निरीश्वरवादी करत आहेत. अल्-कैदाच्या बेलगाम वक्तव्यांवर प्रतिक्रिया म्हणून आम्ही फक्त एकच वाक्य बोलू शकतो, "दाढीवाल्या बोकडांनो, भोसडयात जा."
मुस्लीम आरक्षणाचा आचरटपणा
स्वतःचा मुस्लीम तुष्टीकरणाचा Agenda झाकण्यासाठी पाकिस्तानविरोधी पवित्रा घेऊन कॉंग्रेस पक्ष धूर्त राजकीय खेळी खेळत आहे. चातुर्वर्ण्याधारित मनुवादी संस्कृतीच्या नावाने शंख करण्यात आयुष्य घालवलेल्या सुमार दर्जाच्या साम्यवाद्यांचा मठ्ठपणा मुस्लीम आरक्षणाच्या मुद्यावरून उघड होत आहे. "जातीव्यवस्था हे केवळ हिंदुधर्माचेच व्यवच्छेदक लक्षण असल्याने हिंदूधर्माला विरोध हा आमच्या Ideology चा अविभाज्य भाग आहे", अशी बिनबुडाची बकबक करणारे साम्यवादी आणि बौद्धधर्मीय आता मुस्लीम समाजातील "मागास जातींच्या" आरक्षणाला कशाच्या आधारावर समर्थन देत आहेत ? बहुजन समाज पक्षाच्या मायावतींना पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरवू पहाणा-या निरीश्वरवादी गावगुंडांची एकूणच साम्यवादी/मार्क्सवादी विचारधारा ही तर्कसुसंगत नाही हेच ह्यातून स्पष्ट होतं. काहीतरी बोलायचं म्हणून बोलतात झालं.
मराठा आरक्षणाचा गुगली
मराठा आरक्षणाचा मुद्दा अशा काही चमत्कारिक पद्धतीने रेटला जातोय की एकूण आरक्षणाला विरोध हेच ह्या आंदोलनाचं उद्दिष्ट असावं असं वाटतंय. आरक्षणाच्या विरोधात जनमत्त संघटित करणं हाच हेतू मनात धरून गेली कैक वर्षे हा प्रश्न मुद्दाम चर्चेत ठेवला असावा. हे आरक्षणाचं लोण खाजगी कंपन्यांमधेही शिरेल अशी भीती मार्केटला वाटू लागली आहे. म्हणूनच भाजपाचे ओबीसी नेते गोपीनाथ मुंडे ह्यांना आरक्षणाच्या मुद्यावर कात्रीत पकडण्याचा पक्का निर्धार महाराष्ट्रातील मार्केट-घटकांनी केलेला दिसतो. ह्या सर्व गदरोळात "आर्थिक मागासवर्गीयांसाठी आरक्षण" हा मुद्दा मात्र पद्धतशीरपणे दडपला जात आहे. "क्रीमी लेयरचं आरक्षण काढून घ्या" अशी मागणी पुढे यायला लागल्याबरोबर "एकूणच आरक्षण रद्द करा" ही मागणी जोर धरू लागली ह्याचा अर्थ काय ?


नक्षलवादी आचरटपणा
"अती झालं नि हसू आलं" असाच काहीसा प्रकार गडचिरोली जिल्ह्यातील जंगलात नक्षलवाद्यांनी केलेल्या महाभयानक, क्रौर्याची परिसीमा गाठणा-या, मानवतेला काळिमा फासणा-या, समतेच्या तत्त्वाची राखरांगोळी करणा-या नरसंहाराबाबत झाला आहे. हे नक्षलवादी म्हणजे प्रत्यक्षात तेंदूच्या पानाच्या गुंडाळ्या करून विडया फुकत बसणारे सरबरीत गावठी माठ. त्यातल्या त्यात सुधारलेले निरक्षर मोहाच्या फुलांची दारू झोकून तराट पडलेले असतात. ह्या बेअकल्यांकडे म्हणे रॉकेट लॉंचर्स, हातबॉम्ब, मशीनगन्स अशी आधुनिक हत्त्यारं आणि बराच मोठा दारुगोळा आला आहे. साम्यवाद्यांची लाल करणा-या प्रसारमाध्यमांनी आम्हांला सांगायचं आणि आम्ही ऐकायचं. ह्या असल्या भुक्कड नक्षलवाद्यांना शोधण्यासाठी कैक बंगाली बाबूंनी आयुष्याचा बराच काळ खर्च केला आणि स्वतःचं हसं करून घेतलं. तीच साम्यवादी आगाऊ मंडळी महाराष्ट्राला शेंडया लावायला बघत आहेत. आता राष्ट्रपती नि पंतप्रधानांना श्रद्धांजली वहायला सांगा, शहीद पोलिसांना शौर्यपदकं वाटा आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांचा राजिनामा घ्या. रिकामटेकडया प्रसारमाध्यमांना तरी असल्या आचरटपणाला वारेमाप प्रसिद्धी देण्यापलिकडे दुसरं काय काम आहे ?

No comments:

Post a Comment

We strongly believe in Freedom of Expression. So, comments or criticism in abusive language also is allowed here.
(of course we retain the authority to delete SPAM !)