"आंधळ्याच्या गायी" (३६ २६)
लेखिका : मेघना पेठे ... राजहंस प्रकाशन, पुणे २०००
भविष्यातील अनिश्चिततेमुळे वाटणारी भीती व त्यातून निर्माण होणारी निरीश्वरवादी वृत्ती व्यक्त करणारे पुस्तक म्हणजे एकूण पाच कथानकांचा संग्रह आहे. प्रत्येक गोष्टीमधे मनुष्य स्वभावाचे व भावनिक गुंतागुंतीचे बारकाईने वर्णन केले आहे. "सहोदरा" ह्या गोष्टीतील बहिणीची प्रतिमा उगाचच उजळ केली आहे. प्रत्यक्षात ही स्त्री म्हणजे आयुष्यभर आपल्या भावाबद्दलचा आकस मनात बाळगणारी एक भुक्कड़ बाई आहे. "आएँ कुछ अब्र" ह्या गोष्टीतील बाई 'आपल्याला रूप नसल्यामुळे आपण नाकारल्या जातो' हे पुन्हां पुन्हां सांगत रहाते; पण स्वत: मात्र अनेकजणांना सहजपणे 'शामळू' किंवा 'बावळट' म्हणून नाकारते. तिची संवेदनशून्यता नीट अधोरेखित झालेली नाही. "अठरावा उंट" ह्या गोष्टीत 'आपण स्वैराचाराकडे झुकलो नाही' ह्याबद्दल सुजाताकडून संजीवला कौतुकाची अपेक्षा होती; पण तिच्या दृष्टीने संजीवची एकनिष्ठा हे त्याच्या भेकडपणाचे प्रतीक होते. "आस्था आणि गवारीची भाजी" ह्या कथेतील अनिरुद्ध हा निव्वळ दुतोंडी आहे. आपल्या बायकोला काकूबाई समजणारा अनिरुद्ध मिथिलेच्या बाबतीत मात्र 'हिच्यात संकोच कसा तो नाहीच' असा विचार करतो हे हास्यास्पद आहे. Cohabitation चे समर्थन करणारी मिथिला काकूबाई बनणार नाही हे समजताच Ideology चा जप करणारा अनिरुद्ध तिच्यापासून लांब सरकतो. एरवी स्वतंत्र निर्णय घेणारी मिथिला अनिरुद्ध लांब गेल्यावर स्वत:ला एकाकी समजते हा मानसिक कमकुवतपणा खटकणारा आहे.
No comments:
Post a Comment
We strongly believe in Freedom of Expression. So, comments or criticism in abusive language also is allowed here.
(of course we retain the authority to delete SPAM !)