Friday, September 19, 2008

दह्शतवाद

Stoicism ह्या विषयावर चर्चा करतांना "एखाद्याला वेदना देण्याचा अधिकार परमेश्वराला का असावा ?" हा प्रश्न निरीश्वरवादी नेहमी उपस्थित करतात. एखाद्याला वेदना देणा-या शक्तीला परमेश्वर का समजायचे ? हे तर राक्षसी कृत्य झाले। निरीश्वरवाद्यांच्या ह्या आक्षेपांना उत्तर शोधण्यासाठी आपल्याला 'गु्न्हा आणि शिक्षा' ह्या मुद्याचा मूलभूत दृष्टिकोनातून विचार करावा लागेल.
गुन्हेगाराला गुन्ह्याच्या प्रमाणात शासन व्हायलाच हवं। नाहीतर कर्मफळाचा त्याग न करताच त्या गुन्हेगाराला कर्मबंधनातून मुक्ती मिळाल्यासारखे होते आणि समाजात विषमता पसरू लागते। मात्र सर्व गुन्हेगारांवर जरब बसवण्याच्या नावाखाली हाती लागेल त्या गुन्हेगाराला अव्वाच्या सव्वा शिक्षा ठोठावण्याची मानसिकता हीसुद्धा अपरिपक्व व्यक्तिमत्त्वाचेच लक्षण आहे. अपराध्याला शासन करणा-या यंत्रणेकडे ह्या सर्व गोष्टींचा साकल्याने विचार करण्याची कुवत असायलाच हवी. तशी ती नसेल तर त्या यंत्रणेकडे अमर्यादित अधिकार रहाणं हे कोणाच्याच हिताचं ठरत नाही. आपण समाजाला जेवढे देतो त्यापेक्षा जास्त समाजाकडून घेण्याचा आपल्याला काहीही अधिकार नाही. कोणालाच तसा अधिकार नाही - जसा तो गुन्हेगाराला नाही तसाच तो शिक्षा करणा-या यंत्रणेलासुद्धा नाही.
पण New World Order चे प्रवर्तक मात्र तसं समजत नाहीत. १९६६ सालापासून सामूहिक-निर्णय प्रक्रिया (collaborative decision making) आणि तज्ञांचे मत (experts' opinion) ह्या दोन्हीचे आपल्याला हवे तसे मिश्रण करून प्रस्थापितांनी स्वतःच्या हितसंबंधांचे रक्षण केले आहे. त्यामुळे अतोनात गटबाजी व त्यापाठोपाठ येणारी वशिलेबाजी ह्यांना जागतिक बाजारव्यवस्थेमधे ऊत आला आहे, आपल्याला नकोशा माणसांना बेधडक तळाकडे लोटण्याची प्रवृत्ती बळावली आहे. सामूहिक विचारप्रक्रियेमधून स्वतःला सोयीस्कर निर्णयच बाहेर पडावा ह्यासाठी बिनचूक गणितीय पद्धती विकसित झाल्या आहेत. Bribing a Jury at large has become a simple mathematical procedure. With a little adjustment here & there, collaborative opinion can easily be influenced.
Enlightenment Era च्या अगोदर ग्रीक चर्चेस् नी ज्या पद्धतीने युरोपात स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित केले होते त्याच कोडगेपणाने New World Order चे प्रवर्तक जागतिक बाजारपेठेत स्वतःच्या हितसंबंधांचे रक्षण करत आहेत. अशा दडपशाहीपासून साधनहीनांनी म्हणजेच unprivileged दुर्बलांनी आपले रक्षण कसे करायचे ? नेमक्या ह्याच चक्रव्यूहाचा सामना करतांना दहशतवादाचा जन्म होतो. म्हणूनच गेल्या चाळीस एक वर्षांत जागतिक बाजारव्यवस्थेचा जसजसा विस्तार होत गेला तसतसा दहशतवादाचाही आकार वाढत गेला. पंचमस्तंभी वृत्ती, फसवाफसवी ह्यांच्या समप्रमाणात दहशतवाद फोफावतो. मात्र ह्याचा अर्थ असा नव्हे की आपण दहशतवाद ह्या क्षेत्रात career करू शकतो. दहशतवाद्यांचा अड्डा किंवा बालेकिल्ला अशी कोणतीही गोष्ट प्रत्यक्षात अस्तित्वात नसते. Terrorism is a symbolic representation of "revolt against Racism-repression". Forward Racism आणि Reverse Racism हे Racism चेच दोन भाग आहेत. प्रत्येक दहशतवादी हल्ल्यामुळे चोरांनी पापभीरूंना लुटून जमा केलेला ऐवज हा समाजात परत सोडला जातो. अर्थात प्रत्येकाला त्याचा ऐवज सगळाच्या सगळा लगेच परत मिळतो असं होत नाही. Wealth redistribution ची गणितं थोडी वेगळी असतात. प्रतिदहशतवाद म्हणजेच counter terrorism ही दहशतवादाची mirror-image आहे. प्रतिदहशतवादी म्हणजे Racist प्रस्थापितांनी स्वतःच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी पोसलेले गुंडच आहेत. पण दहशतवादी म्हणजे लुटेरे किंवा गुन्हेगार तर प्रतिदहशतवादी म्हणजे पोलीस असं चमत्कारिक चित्र लोकांच्या मनात उभं करण्यामधे प्रस्थापितांना यश मिळालं. त्यामुळे दहशतवाद्यांची परिणामकारकता दिवसेंदिवस कमी होत गेली आणि प्रतिदहशतवादाच्या नावाखाली हिंसाचार चालूच राहिला. बंगळुरू किंवा अहमदाबाद येथील स्फोटमालिका ह्या दहशतवाद नसून प्रतिदहशतवाद आहे....
ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर परवा (११ सप्टेंबर, २००८) अल् कैदाच्या पाकिस्तानमधील ठिकाणांवर अमेरिकेने केलेला हल्ला तपासणे उद् बोधक ठरेल. मुळात अल् कैदाने कोलांटीउडी मारून प्रतिदहशतवादाचा अंगिकार केला आहे. पण लोकांचा बुध्दिभेद करण्यासाठी ते आपली "अल् कैदा म्हणजे दहशतवादी" हीच प्रतिमा वापरतात. White House ने निष्कारण प्रतिदहशतवाद्यांसाठी निधी मंजूर केला. ह्या निधीचाच वापर करून अल् कैदाचे पलटी मारलेले नेते ताकदवान झाले आणि त्यांनी स्वतःच अल् कैदावरच्या बनावट हल्ल्याचे नाटक प्रसारमाध्यमांतर्फे लोकांपर्यंत पोचवले ...!!!

No comments:

Post a Comment

We strongly believe in Freedom of Expression. So, comments or criticism in abusive language also is allowed here.
(of course we retain the authority to delete SPAM !)