Friday, August 29, 2008

मुंबईचे गावठीकरण

दुकानांच्या पाट्या मराठीत लावण्याच्या मुद्यावरून मुंबईत वाद-विवादांचे पेव फुटले आहे. मुंबई महापालिका आयुक्तांनी एक आदेश जारी करून सर्व दुकानदारांना २८ ऑगस्टच्या आत मराठी पाट्या लावायला सांगितलं. ह्या आदेशाला फाटकन स्थगिती देऊन उच्च न्यायालयाने गोंधळात आणखी भर घातली. आता मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे हे दोन पावले मागे आल्याने ह्या सगळ्या आंदोलनातली हवाच निघून गेली आहे.
कायम कुंपणावर बसलेल्या तथाकथित बुध्दिवाद्यांनी दोन्ही बाजूंनी नगारे बडवत ठेवले आहेत. केवळ परप्रांतीय दुकानदारच मराठी पाट्या लावायला नाखूष आहेत असा सोयीस्कर गैरसमज ह्या वादपटूंनी करून घेतला आहे. शिवसेनेची मराठी अस्मितेची व्याख्या सर्व मराठी भाषिकांना काय म्हणून स्वीकारार्ह असेल? दुकानांच्या पाट्या मराठीत लावल्याने मराठी अस्मितेची जोपासना होते हेच मुळी आम्हांला मान्य नाही. "वोग डी बुटिक" अशा अक्षरांच्या पाट्या मराठीत वाचून कोंबडी खुडुक बसल्यासारखं वाटतं. ही अस्मितेची जोपासना नसून मराठीची निव्वळ मस्करी आहे.
मुळात मराठी भाषेला दिमाखमूल्य कमी आहे. त्यामुळे व्यवस्थापनाशी संबंधित एखादा विषय इंग्रजीत सांगितला की सांगणारा डफड्या असला तरी बृहस्पती वाटतो. पण तोच विषय जर मराठीत सांगितला तर सांगणारा कितीही अभ्यासू असला तरी गावठी वाटतो. म्हणूनच अस्सल पुणेकरालादेखील आपले Letterhead किंवा Visiting card हे इंग्रजीतच असावे असे वाटते. विज्ञान, तंत्रज्ञान, वैद्यक ह्या क्षेत्रातील ज्ञानभांडार मराठीत आणायचे तर मराठी शब्दकोषाची सर्वांगीण वाढ व्हायला हवी. केवळ मराठी विश्वकोषाच्या अनुदानावर हात मारण्याच्या वृत्तीने काहीही साध्य होणार नाही. जेमतेम तीसेक हजार शब्दांच्या शब्दकोषामुळे मराठी भाषा ही केवळ गाणीगिणी करण्यापुरतीच मर्यादित राहिली आहे. ह्या मूलभूत प्रश्नाकडे लक्ष देण्याऐवजी मराठी पाट्यांच्या नावावर राजकारणं करणारे महाभाग महाराष्ट्रात निर्माण व्हावेत हा दैवदुर्विलास नाही तर आणखी काय आहे?

Diesel Engine

4 comments:

Sam said...

Google Map link ---
http://maps.google.com/?ie=UTF8&t=h&ll=16.788734,73.633965&spn=0.006348,0.011029&z=17

Anonymous said...

Link for Harmonium lessons--
http://www.soundofindia.com/lessons.asp

Anonymous said...

check this blogspace ---
http://theartofbeingfeminine.blogspot.com/

Anonymous said...

Whel link : http://www.wikimapia.org/10409016/mr/Samir-Sadashiv-Palsuledesai

Post a Comment

We strongly believe in Freedom of Expression. So, comments or criticism in abusive language also is allowed here.
(of course we retain the authority to delete SPAM !)