Friday, August 22, 2008

ऐतिहासिक रामसेतू

मागे 'इतिहास की पौराणिक कथा' ह्या लेखामधे प्रभंजनशास्त्रींचा "प्रलय" सिद्धांत आपण समजून घेतला. सर्व पौराणिक ग्रंथांचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करणा-या प्रभंजनशास्त्रींचा आणखी एक सिद्धांत आम्ही सुबुद्ध वाचकांसाठी सादर करत आहोत. प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या आणि तर्काच्या कसोटीवर पारखून घेणा-या अभ्यासू वाचकांसाठी हां सिद्धांत म्हणजे बौद्धिक मेवाच ठरेल ह्याबाबत आम्हांला तिळमात्र शंका नाही.
प्रभंजनशास्त्रींचा "रामसेतू" सिद्धांत :
"नल वानरासारखा Civil Engineer प्रभु रामचंद्रांकडे असतांना रामेश्वर ते लंका हा सेतू पाण्याच्या पातळीच्या वर का बांधला नाही ? पाण्याखाली बुडालेल्या सेतूवरून सर्व वानरसेना लंकेपर्यंत काशी काय पोचली ?" प्रभु रामचंद्रांच्या अस्तित्वाबाबत शंका उपस्थित करणा-या तथाकथित बुद्धिवाद्यांना पडलेले हे यक्षप्रश्न आहेत.
असे आचरट प्रश्न उपस्थित करून हे तथाकथित बुद्धिवादी स्वत: मधील वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या अभावाचेच प्रदर्शन करतात. आज संपूर्ण जगाला भेडसावणारा पर्यावरण विषयक गंभीर मुद्दा म्हणजे Global Warming. प्रगतीच्या नावावर अदूरदर्शी धोरणे घाईघाईने राबवली की हा भस्मासुर आ वासून आपल्यापुढे उभा रहातो. कारखान्यांमुळे तसेच बेछूट वृक्ष तोडीमुळे ह्या भस्मासुराची ताकद निरंतर वाढत रहाते. वातावरणाचे तापमान कणाकणाने वाढत जाते. वातावरणाचे सरासरी तापमान केवळ ३ ते ४ अंशांनी जरी वाढले तरी ध्रुव प्रदेशातील बर्फ वितळण्याचा वेग वाढतो. उत्तुंग पर्वतांसारखे भासणारे हिमखंड पत्त्यांचा बंगला कोसळावा तसे कोसळू लागतात. हिमखंडांचे वितळलेले पाणी समुद्राला जाऊन मिळते आणि समुद्राच्या पाण्याची पातळी वाढू लागते. ह्या वाढलेल्या पातळीचा दृष्य दुष्परिणाम म्हणजे पाण्याखाली बुडालेला रामसेतू. प्रभु रामचंद्रांच्या काळात समुद्र पातळीपासून तब्बल ७ पुरूष (४० फूट) वर असलेला विशाल रामसेतू आज Global Warming मुळे पाण्याखाली गेला ह्यात नल वानराचा काय दोष ? पण स्वत:च स्वत:ला intellectuals म्हणवून घेणा-या तथाकथित बुद्धिवाद्यां कडे विचारक्षमता असती तर त्यांच्यावर आगपाखड करण्याचे आम्हांला कारणच नव्हते. पण ...
उडाणटप्पू म्हणती सारे, "रामायण हे नाहि खरे
रामचंद्र तर कधीच नव्हते पृथ्वीवरती खरेखुरे "
जमेल तितका पैसा खाणे हे तर त्यांचे ध्येय असे
राम सेतुचा चुथडा करण्या अवघे होती सज्ज कसे
तेव्हां ह्या सर्व रिकामटेकडया बुद्धिवाद्यांना आमचा आग्रहाचा सल्ला आहे की "प्रभु रामचंद्रांचा द्वेष करणे सोडून त्यांनी विज्ञानाची कास धरावी." भगवद्गीतेमधे तरी दुसरे काय सांगितले आहे ?
ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कूटस्थो विजितेंद्रिय:
युक्त इत्युच्यते योगी सम लोष्टाश्म कांचन:

1 comment:

Anonymous said...

1 ... I will be highly obliged if you give me the list of intellectuals who have asked those questions regarding RamSetu ?
2 ... Industrialisation & thus globalisation has begun in the seventeenth century. Saying that Ramsetu disappered because of Global warming sounds funny. You should not be so bitter towards intellectuals. I am a proud member of intellectuals' cult. I strongly oppose the findings of PrabhanjanShastree. Can you give me his address so that I can personally talk to him ?

Post a Comment

We strongly believe in Freedom of Expression. So, comments or criticism in abusive language also is allowed here.
(of course we retain the authority to delete SPAM !)