Tuesday, July 29, 2008

स्फोटमालिका की सरकारी नौटंकी ?

बंगळुरू आणि अहमदाबादच्या स्फोट-मालिकांचा शिमगा काल संपला पण कवित्व मात्र अजूनही चालूच आहे. ह्या स्फ़ोटांचे उद्दिष्ट तपासतांना आपल्याला Terrorism आणि counter-terrorism ह्यांमधे गल्लत करून चालणार नाही. हे सर्व स्फोट counter-terrorism मधे मोडणारे असल्यामुळे POTA सारखे कायदे लागू करून अशा कारवायांवर नियंत्रण आणण्याची भाषा केवळ हास्यास्पद आहे. स्वत:ला Policy Makers समजणा-या मूर्ख थेरड्यांची टाळकी अजूनही KGB च्याच युगात अडकलेली आहेत. म्हणूनच प्रसार माध्यमांनी आता Intelligence आणि counter-Intelligence चे च-हाट वळायला सुरुवात केली आहे.
भा.ज.पा. मधील पण्डिता सुषमा स्वराज ह्यांनी काल बिनबुडाचे विधान केले की बंगळुरू आणि अहमदाबाद येथील स्फोटमालिका ह्या UPA सरकारनेच घडवून आणल्या आहेत. "विश्वास दर्शक ठराव" काय किंवा "अमरनाथ जमीन हस्तांतरण" मुद्दा काय, सर्वच अघाड्यांवर भा.ज.पा.ची अवस्था केविलवाणी झाली आहे. ज्या क्षणी (१९९८ साली?) 'आपण अणुकराराच्या विरोधात नाही' अशी भूमिका भा.ज.पा.ने घेतली, त्याच क्षणी भा.ज.पा.छे अस्तित्व अर्थहीन झाले. 'अणुकरार विरोधक हे भा.ज.पा. समर्थक असणारच' हे जणू प्रसार माध्यमांनी गृहीतच धरले आहे. म्हणूनच 'अणुकरार विरोधकांना अफजलच्या फाशीपासून Cross border Terrorism च्या निरर्थक मुद्यांचा काथ्या कुटायला लावायचाच' ह्या उद्देशाने प्रसारमाध्यमे कामाला लागली आहेत. हातात कसलेही मुद्दे नसतंना आचरटासारखा फोफावालेला भा.ज.पा. म्हणजे केवळ Political Redundancy आहे.
अर्थात सुषमा स्वराज ह्यांच्या भन्नाट वक्तव्याने एक दिलासा मात्र जरूर मिळतो की
हे सर्व स्फोट म्हणजे अचाट बुद्धिमत्ता(?) वापरून केल्या जाणा-या जागतिक हिंसाचाराचा भाग नाहीत तर भारतातल्याच सुमार दर्जाच्या गुन्हेगारांनी घडवून आणलेली ही "सरकारी नौटंकी" आहे...

No comments:

Post a Comment

We strongly believe in Freedom of Expression. So, comments or criticism in abusive language also is allowed here.
(of course we retain the authority to delete SPAM !)