Tuesday, July 22, 2008

भा.ज.पा. चा महापोपट

आज २७५ विरूद्ध २५६ मतांनी सरकारवरील विश्वासदर्शक ठराव लोकसभेने संमत केला. गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या लालकृष्ण अडवाणींचा तर पचका झालाच पण कुंपणावर बसलेल्या मार्क्सवाद्यांनाही आपली लायकी समजली. सदैव Ideology ची टिमकी वाजवत बसलेल्या मार्क्सवाद्यांच्या सहकार्याशिवायही आपण सरकार चालवू शकतो हे उशिरा का होईना पण कॉंग्रेसच्या लक्षात आले. स्वातंत्र्यवीर सावरकरांना तुरुंगात पाठवणारे दुतोंडी मार्क्सवादी जवाहरलाल नेहरूंच्या अदूरदर्शी धोरणांमुळे देशाला डोइजड झाले होते. ती मार्क्सवादी कीड सरकारमधून खरवडून निघाली हे उत्तम झाले.
आम्ही मागेच म्हटल्याप्रमाणे Nuke deal संबंधी Policy Makers चा Veto डावलून सरकारने हा करार पुढे रेटला तर त्या कराराची किंमत शून्य आहे. No credit will be created against such non-ratified silly agreement. भा.ज.पा.मधील रिकाम टेकड्यांना मात्र आता हिंदुत्ववादाचा चोथा चघळत बसण्यापलिकडे काहीही काम उरलेले नाही. अर्थात दुसरे काही करण्याची कुवत ही त्यांच्यात नाही. सेतुसमुद्रम बाबत त्यांनी घेतलेल्या पवित्र्यावरून हे मागेच सिद्ध झालेले आहे. असो, मेलेल्याला अधिक मारण्यात अर्थ नाही.

No comments:

Post a Comment

We strongly believe in Freedom of Expression. So, comments or criticism in abusive language also is allowed here.
(of course we retain the authority to delete SPAM !)