Monday, May 26, 2008

कन्नडिगांचा हिसका

शेवटी कन्नडिगांनी जनता दलाला योग्य तो धडा शिकवलाच. गेल्या निवडणुकांपेक्षा यंदा जनता दलाच्या तीसेक जागा कमी झाल्या. जनता दलाची ही दारुण अवस्था अपेक्षितच होती. पण ११० जागा मिळवून भा.ज.पा. एवढे घवघवीत यश संपादन करेल असे कोणाला वाटले नव्हते. जनता दलाच्या कमी झालेल्या जागा कोंग्रेसच्या परड्यात का पडल्या नाहीत ह्याचे उत्तर कोंग्रेसच्या धरसोड़ वृत्तीतच दडलेले आहे. जवाहरलाल नेहरुंपासूनच कोंग्रेसला मार्क्सवाद्यांची खुशामत करायची सवय लागलेली आहे. स्वत:ला डावे म्हणून घेणारे राजकीय पक्ष हे प्रत्यक्षात भारतातील खर्या डाव्या गटातील लोकांपासून लांब गेलेले आहेत. Arms Race Lobby च्या लंगोट्या धुणारे डावे राजकीय पक्ष हे भारतातील डाव्या जनतेचे प्रतिनिधी अजिबात नाहीत. स्वत:चा डफ्फड कार्यक्रम लोकांच्या माथी मारण्याचा हां डाव्या पक्षांचा कावा मतदारांच्या लक्षात यायला लागला आहे. महणूनच अशा पंचमस्तम्भी डाव्या पक्षांना डोक्यावर बसवून ठेवनार्या कोंग्रेसलाही कर्नाटकने निर्णायक बहुमत दिलेले नाही.
पाश्चीमात्यांच्या धाटणीवर भारतातील राजकीय व्यवस्था चालवता येत नाही. धर्मनिरपेक्षतेचा उदो करत प्रत्यक्षात निरीश्वरवादाचा अंगिकार केल्यास भारतात राजकीय हानी होऊ शकते हेच हया कर्नाटकच्या निकालांनी दाखवून दिले आहे.

No comments:

Post a Comment

We strongly believe in Freedom of Expression. So, comments or criticism in abusive language also is allowed here.
(of course we retain the authority to delete SPAM !)